ऑनलाईन टीम/तरुण भारत
कोलकाता येथील ‘इंडियन म्युझियम’मध्ये एका CISF जवानाने आपल्या दोन सहकाऱ्यांवर गोळ्या झाडल्या आहेत. इंडियन म्युझियमच्या सीआयएसएफ बॅरकजवळ हा गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला आहे. ए.के. मिश्रा असे गोळीबार करणाऱ्या जवानाचे नाव असून तो सीआयएफमध्ये पोलीस हेड कॉन्स्टेबल आहे.
दरम्यान, कोलकाता येथील भारतीय संग्रहालयात तैनात असलेल्या एका CISF जवानाने आपल्या दोन सहकाऱ्यांवर गोळ्या झाडल्या. यामध्ये एकाच मृत्यू झाला असून एकजण जखमी आहे. ( Park Street Shootout ) आहे. अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.
त्यांनी सांगितले की, जवानाने सहाय्यक उपनिरीक्षक आणि हेड कॉन्स्टेबलला त्याच्या सर्व्हिस शस्त्राने गोळ्या घातल्या. भारतातील सर्वात जुने आणि सर्वात मोठे म्युझियम कॉम्प्लेक्समध्ये बांधलेल्या बॅरेकमध्ये संध्याकाळी ७.४५ च्या सुमारास ही घटना घडली.
हे ही वाचा : ‘ISRO च्या SSLV-D1’चे यशस्वी उड्डाण, पण इस्त्रोकडून मोहीम पूर्ण झाल्याची घोषणा नाही
मिळालेल्या माहितीनुसार कोलकात्यातील इंडियन म्युझियमच्या सुरक्षेसाठी तैणात असेलल्या सीआयएसएफ जवान मिश्रा यांनी अचानक आपल्या सहकाऱ्यांवर एके ४७ रायफलने गोळीबार केला. या गोळीबारात सीआयएसएफचे सहाय्यक उपनिरीक्षक रणजीत कुमार सरानी यांचा मृत्यू झाला असून सहाय्यक कमांडंट सुवीर घोष जखमी झाले.
गोळीबाळ झाल्यानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. मिश्रा यांनी एके ४७ रायफलमधून २० ते २५ राऊंड फायरिंग केल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेनंतर कोलकाता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मिश्रा यांना ताब्यात घेतलं आहे. मात्र, त्यांनी हा गोळीबार क केला? याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नसून जवानाची पोलिसांकडून चौकशी केली जात असल्याची माहिती कोलकाता पोलीस आयुक्त व्ही. के. गोयल यांनी दिली.
हे ही वाचा : श्रावण विशेष : ‘या’ गावात केला जात नाही मांसाहार! १०० टक्के लोक शाकाहारीच…